• आत्मनिर्भर बनायचे आहे का?
• वेळेचे व पैशाचे स्वातंत्र्य हवे आहे का?
• तुम्हाला नवीन उद्योग सुरू करायचा आहे का?
• तुमचा सध्याचा उद्योग विस्तारित करणे आहे का?
• सध्याच्या परिस्थितीला जुळवून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विचार करत आहात का?
• तुमच्या उद्योगांमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी योजना आखत आहात का?
वरील प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर उद्योजकासाठी लागणारे सुप्तगुणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपला स्वतःचा व्यवसाय तुम्ही चांगल्या प्रकारे भरारी घेण्यास प्रवृत्त होऊ शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे काम करून स्वतःची प्रगती करू शकता जगप्रसिद्ध उद्योजकांचा अभ्यास करून त्यांच्याप्रमाणे यशस्वी उद्योगाचा प्रयत्न करू शकता. उद्योजक आपल्या उत्कृष्ट बुद्धिमत्तेने अचूक निर्णय घेऊन सर्वांशी विचारविनिमय करून योग्य निर्णय घेतो नेहमीच प्रगतीशील विचारांनी स्वतःचे अस्तित्व टिकवून आर्थिक नियोजन करतो व प्रत्येक काम न घाबरता जोखीम उचलतो त्यासाठीच आपण पाहणार आहोत यशस्वी उद्योजकाची ९ मूलमंत्र.
१) उत्तमच कॉलिटी आणि उत्तम सर्विस
चांगले काम व उत्तम प्रतीचे उत्पादन थोडा वेळ लागतो परंतु एकदा का तुम्हच्या कामाचा दर्जा लोकांना कळला की उत्तम दर्जा साठी लोक तुम्हाला अधिक पैसे देणे सुद्धा पसंत करू शकतात त्यामुळे तुमच्याबद्दल लोकांना चांगला विश्वास निर्माण होऊ शकतो.
२) आर्थिक नियोजन

उद्योगांमध्ये फक्त स्वतःची बचत वापरणे धोकादायक आहे. सरकारी योजना, बँकेकडून फंड उपलब्ध करणे व गुंतवणूकदार मिळविणे. आर्थिक नियोजन आखून प्रोजेक्ट बनवणे त्यामुळे आर्थिक धोका कमी जाणवतो.
३) यशस्वी उद्योजकांची पुस्तके वाचणे
नियमित यशस्वी उद्योजकांची पुस्तके वाचावी, तुमच्या उद्योगा संबधी वाचन करावे. उद्योग करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळते. धोका असण्याची कारणे आपल्याला सूचित होतात, उद्योगांमध्ये अधिक विचार करणाऱ्या संधी प्राप्त होतात.
४) विश्रांती घेऊन विचारविनिमय करणे
आपल्या उत्पादन क्षेत्रामध्ये आठ ते दहा तास कामांमध्ये यांत्रिकीकरण आले असते परंतु कामामध्ये ब्रेक घेऊन सहकाऱ्यांशी चर्चा करून ठराविक वेळ विश्रांती घेऊन आत्मपरिक्षण करणे फारच गरजेचे असते त्यामुळे येणारे निष्कर्ष अचूक असतात अंतरात्म्याचा आवाज योग्य निर्णय घेण्यास मदत करतो.
५) नेतृत्व.
उद्योगांमध्ये फक्त बॉस किंवा हेड असणे गरजेचे नाही तर तुम्हीआपल्या सहकाऱ्यांसोबत घेऊन निर्णय घेणे त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे त्यांच्या आरोग्याची व कुटुंबासाठी योजना आखणे. मशीन मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या विमा काढून घेणे कामाचा योग्य तो मोबदला मिळवून देणे कंपनीचे भागीदार आहेत त्याप्रमाणे मोबदला योग्य तो देणे सांस्कृतिक प्रोग्राम करून एकत्रित एकजुटीने काम करण्यास प्रवृत्त करणे त्यामुळे उद्योग वाढीस व स्थिरता येण्यास मदत होते.
६) लवकर उठणे

सकाळी लवकर उठणे त्यामुळे स्वतःला 20-20-20 या सिद्धांतासाठी वेळ देता येतो म्हणजे वीस मिनिटे मेडिटेशन 20 मिनिट एक्झरसाइज, 20मिनिट ध्येय लिहिणे व कामाची यादी बनवणे हे केल्यास संपूर्ण दिवस आनंदाचा जातो. दिवस सुरू होण्यापूर्वी योग्य नियोजन केल्यास पूर्ण दिवस चांगल्या प्रकारे काम करता येते. ठरवल्याप्रमाणे योग्य दिशेकडे वाटचाल करतो व तिचा आनंद घेता येतो नियमित व्यायामामुळे आपले शरीर सदृढ रहाते आपल्याला चांगली ऊर्जा मिळू लागते. मेडिटेशन मुळे मानसिक संतुलन राखून योग्य ते निर्णय घेण्यास पात्र होऊ शकतो.
७) नियोजन

कामाचे ठिकाण नियोजित पणे आखणी केलेली असावी काम चांगल्या प्रकारे वाटप करावे. त्यामुळे योग्य ते निर्णय घेऊ शकता व उचित मांडणीमुळे कमी वेळेमध्ये कामाचे उत्पादन क्षमता वाढू शकते.
८) आव्हान स्वीकारणे

नेहमीच वेगवेगळ्या काम करण्याच्या संधी येतात, वेगवेगळ्या उपक्रमांना व अचानक येणाऱ्या संकटांना सामोरे जावे लागते, स्वतःला वचनबद्ध ठेवून ठराविक वेळेला ठरावीक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, त्यामुळेच स्वयंशिस्तीने काम करता येते व कामाचा आनंद घेऊन यशस्वी वाटचाल करू शकतात.
९) अपयश

उत्तम उद्योजक धोका पत्करण्यास सक्षम असतो कोणतेही अपयश हे नवीन मार्ग दाखवते त्यामुळे नवीन कामाची संधी आहे हे समजून त्याकडे लक्ष द्या अपयशाने घाबरून न जाता मार्गक्रमण करण्याकडे लक्ष केंद्रित करणे.
वरील नऊ मूल्य मंत्रांचा वापर केल्यास यशस्वी उद्योजक होऊ शकतो. उत्पादन वाढवण्यासाठी, भरगोस नफा मिळवण्यासाठी, उद्योगाची जाहिरात करणे आवश्यक आहे. नवीन उद्योगाचे प्रचार व प्रसार करणे जरुरी आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पुनम राणे
प्रद्युमना डिजिटल वर्ल्ड
Good. KEEP IT UP
ReplyDeleteCrisp and clear thought . Good . All the best
DeleteNice write up
ReplyDeleteThank you Sir
Deletemast content very useful
ReplyDeleteThank you very much
Deleteखूपच छान मॅडम
ReplyDeleteKeep it up
Thanks for your Good support
DeleteVery good content and presentation.
ReplyDeleteThank you very much
DeleteVery nice and useful information 👍👌
ReplyDeleteThank you very much
ReplyDelete