तुमची Advertisement प्रभावी आणि आकर्षक बनवण्या साठी ३ मूलभूत सूत्रे .


मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांना टी व्ही Ads, मोबाईल Ads, युट्यूब, इंस्टाग्राम Ads बघून,”ह्या Adsचा कंटाळा आला आहे नुसता”. तुम्ही कधीतरी हे वाक्य नक्कीच बोलला असाल.पण मित्रांनो एक गोष्ट सांगू, तुम्हाला जर एखादी Ad आवडली ना तर तुम्ही ती पूर्ण संपेपर्यंत  बघता. हे कसं होतं मित्रांनो तुम्हाला जर यामागचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच  वाचा.

मित्रांनो, तुम्हाला मी अशी काही सिक्रेट्स सांगणार आहे, असे काही टिप्स देणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या उद्योगाची जाहिरात करण्यामध्ये आणि Branding करण्यामध्ये फार मदत होईल  आणि Lockdown मध्ये सुद्धा  तुमचा Sale डबल होईल.सर्वात पहिले आपण  जाणून घेऊया Ads कोण-कोणत्या प्रकारच्या असतात.
  • प्रिंट Ad (Hoarding, Standees, Wallpaper, Banner, Pamphlet, Catalogues, Borchures)
  • टीव्ही Ad
  • युट्युब Ad (Short Video)
  • सोशल मीडिया Ad (Post, Story, Status, Web banner)
  • ब्लॉग्स 
  • रेडिओ Ads (Podcast)
ज्या प्रकारची तुमची Ad असेल त्या प्रकारची ब्रांड Image तुम्ही तुमच्या ग्राहकाच्या हृदयात निर्माण करता. तुमची जाहिरातीचा दर्जा लोकांच्या मनात तुमची ब्रँड value निर्माण करतो, (साधा चालू  ब्रँड आहे कि वर्ल्ड क्लास, विश्वासू ब्रँड आहे). उदा. जेव्हा पण आयुर्वेदिक product घ्यायला जातो तेव्हा पहिले आपण काय शोधतो पतंजली, मसाले घ्यायला जातो तर Everest च शोधतो, असं का ?
कारण त्याची Ad आपण रोज बघतो. एखाद दिवशी त्यांची Ad नाही आली तर आपण काय म्हणतो ही Company बंद झाली कि काय ? हा प्रश्न येणं साहजिकच आहे. 
दुसरा कोणतंही प्रॉडक्ट बाटा पेक्षाही उत्तम असेल, तरी ते १० वेळा चेक करणार, नीट तपासून मग घेणार. हाच फरक पडतो तुमच्या ब्रँड च्या जाहिरातीचा. आणि जाहिराती केल्याने तुम्हाला visibilty मिळते, चार चौघात तुमची चर्चा होते आणि प्रचार होतो. 
आणि हेच उद्दिष्ट असतं एका Advertisement च. तर मित्रांनो तुम्हाला मी तीन मूळ घटकांचीची माहिती सांगणार आहे.
ज्यावर तुम्ही काम केलं तर नक्कीच  दर-वेळेला चांगलीच ad तुम्ही बनवू शकता. तुम्ही हे घटक प्रत्येक Ad मध्ये बघू शकता. त्याच प्रमाणे मोठ्या कंपन्या  यांचा वापर करून किती उत्कृष्ट Ads बनवतात याचा अभ्यास करून स्वतःच चांगल promotion करू शकता.
चला तर मग जाणून घेऊया हे तीन मूलभूत घटक काय आहेत..

1) Content
तुम्हाला नेहमी प्रश्न पडत असेल नेमक जाहिरात मध्ये लिहायचं काय? बोलायचं काय? एखादा मॅसेज तुम्हाला तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचवायचा आहे तर नुसती Ad करणं महत्त्वाचं नाही, तर ती Ad, तुम्ही ‘का?’ करत आहात हा संदेश, तुमच्या Content द्वारे तुमच्या योग्य ग्राहकांपर्यंत पोहचला पाहिजे. Content बनवताना खालील काही विषयांवर तुम्हाला काम करणे आवश्यक आहे.  
  • योग्य ग्राहक (Target Clients)
      
तुमचा ग्राहक  कोणत्या वयोगटातील आहे?, त्याची जीवन पद्धत कशी आहे?, त्याची आवड काय आहे?, त्याला कोणती गोष्ट सगळयात जास्त भावते ? ह्या प्रश्नांची जेव्हा तुम्हाला उत्तर  मिळतील तेव्हा तुम्हाला तुमचा योग्य ग्राहक सापडेल. आणि त्याला संबोधून तुम्हाला तुमची जाहिरात निर्माण करायची असते. 
  • उत्कृष्ट punchline : तुमची punchline जास्त प्रभावी असेल, वेगळी असेल, लक्षवेधी असेल, तितकं जास्त तुम्ही तुमच्या ग्राहकांना खेचून आणता.
तो एक प्रश्न असू शकतो, एखादा विचार असू शकतो, किंव्हा तुमच्या व्यवस्थापनेचं नाव. तुमचं punchline ने ग्राहकांच्या भावनांना स्पर्श करा.
  • Key Wordsचा वापर: तुमचे ग्राहक सध्याच्या स्थितीला सर्वात जास्त इंटरनेट वर काय search करतात.  त्या शब्दांचा वापर करून तुम्ही तुमची एक चांगली जाहिरात बनवू शकता.  जेणेकरून तुमचे ग्राहक जेव्हा त्याबद्दल search करतील, तेव्हा तुमचं नावही त्या searchच्या यादीत दिसेल.  
  • ग्राहकांची समस्या सोडवा:  ग्राहक तुमची जाहिरात तेव्हाच बघणार जेव्हा त्यांच्या समस्यांचे समाधान होते. म्हणून तुमच्या जाहिरातीद्वारे ग्राहकांच्या समस्या कशा सोडवता येतील, याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या जाहिरातीला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल.  ग्राहक तुमचं प्रॉडक्ट नाही घेत तर तुम्ही त्यांच्या समस्या किती चांगल्या प्रकारे सोडवता, यावर तुमच्या प्रोडक्टची विक्री अवलंबून असते.
  • सामाजिक संदेश तुमची जाहिरात जर एखादा सामाजिक संदेश देत असेल तर ती ग्राहकांच्या मनाला भावते. तुमचे ग्राहक तुमचे प्रोडक घेण्याची शक्यता वाढते. म्हणून तुमच्या जाहिराती मध्ये एखादा सामाजिक संदेश देणे आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती ओळखून तुमच्या  उद्योगाच्या निगडीत सामाजिक संदेश द्या.

2. Design:
जाहिराती मध्ये design ला खूप जास्त प्राधान्य असते. नुसतं चार रंग लावले म्हणजे design झाली असं नाही होत. एखादी ad तेव्हाच चांगली दिसते जेव्हा योग्य graphics, योग्य colour combination, योग्य pictures योग्य मांडणी केलेली असते. तुमची Ad तेव्हा तुमच्या  ग्राहकांचे  लक्ष खेचू शकते, जेव्हा तुमच्या ad ची design आकर्षक असते. म्हणून design ला ad मध्ये खूप जास्त प्राधान्य दिला जात. रंग रचना तुमच्या लोगो शी match झाली पाहिजे. 
Design बनवताना काही मुद्दे लक्षात ठेवावे लागतात. खालील दिलेले पॉईंट्स लक्षात घेतले पाहिजेत.
  • Colours: Design मध्ये colour ला खूप जास्त महत्व दिले जाते , एखादी ad तेव्हाच तुमचे लक्ष खेचून घेते जेव्हा Colours eye catchy असतात ह्या साठी colours ची जाण असणे आवश्यक आहे. तुमच्या design चा colour तुमच्या लोगोच्या colour शी match झाला पाहिजे. किंव्हा त्याच्या contrast colours चा असला पाहिजे, जेणे करून तुमच्या Colours ची फॅमिली निर्माण होते. जर तुमच product खायचं असेल तर, पदार्था च्या रंगा प्रमाणे लेबल ची design आणि  ईत्तर Ads designs केल्या जातात. भरपूर colours वापरले तर तुमच्या designचा शो निघून जातो, त्याच बरोबर तुमची ब्रँड value  शून्य होऊन जाते. म्हणून colours हे लक्षवेधी आणि स्टॅंडर्ड मोजकेच असले पाहिजे, जेणेकरून तुमची design प्रोफेशनल वाटल. ( कधी हि Dark Background वर Dark Colour, वापरू नका.) 
  • Social MediaDigital Ads बनवताना design colour RGB format मध्ये असला पाहिजे. व printing साठी CMYK format मध्ये असला पाहिजे. तरच योग्य colour output मिळेल. 
आता वरील Ad कडे बघा ह्या मध्ये Zomato च्या लोगोचा colour किती eye-catchy आहे आणि ad पण किती लवकर नजरेस पडते. 

दुसरे उदाहरण JUMBOKING च, फक्त दोन colours, पण लक्ष खेचून घेणारे, रस्त्यात चार ad असतील पण ह्या ad कडे लगेच तुमचं लक्ष जाईल. 
हे importance आहे Colours चे advertising मध्ये.
  • Visibility : हा एक बहू मूल्य मुद्दा आहे . तुमची Ad कशा वर दिसणार आहे, mobile वर, वर्तमान पत्रात, छोटा बॅनर आहे , pamphlet आहे, कि मोठं hoarding, कि Short Video तुमचं Content visible असला पाहिजे. नाहीतर तुमचं Ad बनवून काही उपयोग नाहीतुम्हाला तुमच्या Ad मध्ये  काय highlight  करायचं आहे म्हणजेच उद्दिष्ट काय आहे, हे visible असले पाहिजे. एखादी ad मोबाईल वर कशी दिसेल आणि तेच एका मोठ्या hoarding  वर कशी दिसेल यामध्ये खूप फरक असतो म्हणून visibility त्यानुसार त्याची design बनवली जाते. (अक्षरांची size, लोगो ची size, Tagline ची size किती Small/Big)

3) Call to Action: 
ग्राहकांनी तुमची Ad बघितल्या वर काय केले पाहिजे, हे ठरवत तुमचं Call to Action, उदा. Buy Now, Book Now, Order Now, Ride Now, Try Now, ह्याने तुम्ही तुमच्या ग्राहकांना Action घेण्यास प्रवृत्त करता. कारण ही Action घेतल्या वर तुमचा Sales-generation होणार आहे. 
Call to Action बटण मुळे ग्राहक तुमच्या Ad चा प्रतिसाद देण्याची शक्यता ७०% वाढते. म्हणून Call to Action देण महत्वाचे आहे. 
तर मित्रांनो हे होते Advertising प्रभावी करण्याचे ३ मूलभूत घटक. जे तुमच्या Ad ला ९०% इतरां पेक्षा अधिक प्रभावी, आकर्षक बनवतात. माझा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचला ह्या बद्धल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. 
माझी अशी इच्छा आहे, की तुमची Ads, ही इतरां पेक्षा जास्त प्रभावी आणि देखणी असली पाहिजे.  तुम्हाला पण अशाच काही आकर्षक आणि Professional Ads बनवायचे असतील तर, तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या link वर क्लिक करून संपर्क करू शकता. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या जवळच्या लोकं पर्यंत share करा.   

Facebook Page - || Pradyumna Digital World ||

आमचं Mission : माझा ध्यास आहे, कमीत कमी १०० अश्या महाव्ताकांशी उद्योग ज्यांचा turnover 1Cr. पेक्षा जास्त आहे त्यांना World Class branding, Digital Printing द्वारे करून देणे आणि त्यांचा उद्योगाला अजून जास्त उचांक गाठून देणे.
पुन्हा भेटूया फूडच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद ........ 

Comments

  1. थोडक्यात पण महत्त्वाचे मुद्दे चांगल्या पद्धतीने मांडले आहेत.

    ReplyDelete
  2. SUPERB, Nobody can believe that it's your first "BLOG"
    Really Great

    ReplyDelete
  3. छान.. सुरुवात आहे..!

    ReplyDelete
  4. Detailed and important information about ads 👍🏻 all the best for your mission .

    ReplyDelete
  5. Ad should speak volumes about your work

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी उद्योजकाची 9 मूलमंत्र

BRANDING WITH CUSTOMIZED WALLPAPER